Weather Update : या जिल्हयात रेड ॲलर्ट, मुंबईसह ईतर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, IMD कडून नवा अंदाज जारी

757

Weather Update : या जिल्हयात रेड ॲलर्ट, मुंबईसह ईतर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, IMD कडून नवा अंदाज जारी

मुंबई: हवामान विभाच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली. भारतीय हवामान विभागानं आता नवीन अंदाज जारी केला आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पालघर आणि नाशिकमध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे या भागात आहेत.

भारतीय हवामान विभागांनं पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here