Weather Change | राज्यात विचित्र हवामान, पुण्यातून थंडी गायब

883

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानामध्ये (Weather Change) अचानकपणे परिवर्तन झाले आहे. अरबी तसेच बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस (Rain In Winter) बरसतोय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही ठिकाणी पाऊस झालाय. तर, थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. नोव्हेंबर महिना संपायला अवघे 10 दिवस उरले आहेत. मात्र, राज्यातील काही भागात थंडी नाही तर उकाडा वाढलाय.

पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात ही वाढ दिसून येत आहे. परिणामी पुणे शहरात उकाडा काही प्रमाणात वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुणे शहर आणि आसपासच्या भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये.

कोकणात अवकाळी पावसानं हवामानात मोठा बदल झालेला पहायला मिळतोय. नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडी गायब झालीये आणि कोकणात सध्या विचित्र हवामान पहायला मिळतंय. सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी कडकडीत उन आणि पुन्हा सायंकाळी पाऊस असं काहीसं विचित्र वातावरण कोकणात पहायला मिळतंय. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. पण, सध्या कोकणवासीय विचित्र हवामानाचा सामना करताना पहायला मिळताय.

नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यात अधून मधून रिमझिम पावसाची देखील बरसात होतेय. अवेळी पडणाऱ्या या पावसाने आणि सूर्यदर्शन होत नसल्याने रब्बीचा हंगाम धोक्यात आलाय. या विचित्र हवामानाला तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाला चांगलाच फटका बसतोय. तर, हवामान बदलातील या घटकामुळे मलेरिया डेंग्यूसह साथ रोग आजार बळावण्याची भीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here