Weather : विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम, उत्तर भारतात थंडीपासून दिलासा

420

India Weather Update : उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. एकीकडे दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सूर्यप्रकाशामुळे थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये धुक्यामुळे थंडीची लाट कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीतील लोकांना बदलत्या हवामानामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळू शकते, कारण येत्या आठवड्याच्या शेवटपर्यंत हवामानात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पुढील आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याने थंडीपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान, राज्यात गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे, नाशिक, नागपूर, जालना या ठिकाणी आणखी थंडीची लाट आहे. अन्य ठिकाणी राज्यात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

महारष्ट्रात तापमानात चढ उतार होत असल्याची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमनात घट झाली आहे. राज्याच्या दक्षिण भागात मात्र, उन्हाचा चटका कायम आहे. त्यामुळे तिथे थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उत्तरेकडील वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही भागात थंडी कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा बर्फवृष्टी होऊन थंडी वाढू शकते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही दिवसांत बिहारमधील लोकांनाही थंडीपासून दिलासा मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. बिहारमध्ये आज सूर्यप्रकाश राहणार आहे. आज राज्यात कमाल तापमान 20 तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये लोकांना सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिथे पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये कमाल तापमान 21 आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअस राहणार आहे.  बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात चढउतार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली. त्याचवेळी, हवामानाचा मूड बदलला आहे. राज्यात आज लख्ख सूर्यप्रकाश असेल. त्याचबरोबर वाऱ्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here