Unseasonal Rain : यंदा दिवाळीत अवकाळी बरसणार

    133

    नगर : राज्यात थंडीची चाहूल लागलेली असताना पावसाच्या (Unseasonal Rainअनपेक्षित हजेरीने सर्वांचीच धांदल उडाली आहे. बुधवारी (ता.8) सिंधुदुर्गपासून कोल्हापूरपर्यंत पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेली मुंबई देखील याला अपवाद ठरली नाही. तर दक्षिण भारतामध्येही अनेक राज्यांना पावसाने झोडपले.

    दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पावसाची हजेरी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या पावसाचा परिणाम गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली भागात सुद्धा पावसाची हजेरी असेल. तर नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये वातावरण  अंशत: ढगाळ असेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याच्या स्थितीत पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here