Train accident attempt : रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न

    125

    Train accident attempt : श्रीगोंदा: तालुक्यातील बेलवंडी स्टेशन ते विसापूर स्टेशनच्या दरम्यान मोहरवाडी जवळ निजामबाद पॅसेंजर रेल्वेचा अपघात (Train accident attempt) घडवण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर अज्ञात इसमाने सिमेंट पोल ठेवला होता. रुळावर टाकलेल्या पोलची माहिती रेल्वे ट्रॅक मॅनच्या (Railway track man) लक्षात येताच याबाबत बेलवंडी रेल्वे स्टेशन मास्तरला (Railway Station Master) फोनद्वारे कळवल्याने मोठी दुर्घटना टळली.        

    रेल्वे ट्रॅकमन बेलवंडी स्टेशन येथे काम करत असताना बेलवंडी स्टेशन ते विसापूर रेल्वे स्टेशन दरम्यान मोहोरवाडी परिसरात रेल्वे रुळावर कोणीतरी अज्ञात इसमाने हेक्टोमीटर पोल आडवा ठेवला असल्याची माहिती गॅंग मुकादम जालिंदर भाना यांनी फोन वरून कळविली. त्यानुसार ट्रॅकमन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मोठी रेल्वे दुर्घटना होण्याचा संभव असल्याने राजेंद्र यादव यांनी बेलवंडी स्टेशन मास्तरला फोन करून घटनेची माहिती दिली. प्रसंगावधान राखत स्टेशन मास्तरांनी रेल्वे रुळावर जाणारी रेल्वे गाडी निजामबाद पॅसेंजर ही बेलवंडी स्टेशनला थांबवली.  सिमेंट पोल रुळावरून बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे अडविण्याच्या उद्देशाने, रेल्वे संपत्तीला धोका पोहचवण्याचा, रेल्वेचे नुकसान करण्याचा आणि रेल्वे गाडी चालविण्यास अडथळा निर्माण केला म्हणून ट्रॅकमन राजेंद्र यादव यांच्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here