Tractor rally : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीने दणाणले श्रीरामपूर

    127

    Tractor rally : श्रीरामपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers’ movement) पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Jan Shakti Party) वतीने नेवासे ते श्रीरामपूर ट्रॅक्टर रॅली (Tractor rally) काढण्यात आली. २५० हून अधिक ट्रॅक्टर यात सहभागी झाले होते. ही रॅली नेवासेहून श्रीरामपूर येथे दुपारी अडीचच्या सुमारास दाखल झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रॅली अडविल्याने पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. नंतर रॅली मुख्य रस्तामार्गे प्रांत कार्यालयासमोर आल्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत यांनी निवेदन स्वीकारले.

    स्वामीनाथन आयोग लागू करावा (Tractor rally)

    दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तसेच हमीभावाचा भावाचा कायदा करून स्वामीनाथन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली होती. सकाळी नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरापासून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर रॅली श्रीरामपूरच्या दिशेने निघाली. रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. श्रीरामपूर शहरात दुपारी अडीचच्या सुमारास रॅली दाखल झाली.

    पोलिसांबरोबर बाचाबाची (Tractor rally)

    दरम्यान, श्रीरामपूर बाजार समिती समोर रॅली बॅरिकेट लावून अडविण्यात आली. त्यामुळे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांची पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याबरोबर बाचाबाची झाली. पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी भाषा वापरल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. शेतकरी आंदोलकांनी फक्त २० ट्रॅक्टर शहरात न्यावेत, अशी विनंती केली. परंतु, आंदोलकांनी सर्व १०० हून अधिक ट्रॅक्टर शहरात नेणारच अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी समंजस्याची भूमिका घेतल्याने आंदोलकांनी पुढे वाटचाल केली.

    महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार, हातात कांद्याची माळ व पायावर दूध ओतून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करून सरकार विरोधी घोषणा देण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी रॅलीने जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. संध्याकाळी पाच वाजता ही रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here