Theft : मोटारसायकली चोरून विकणारी टोळी पकडली

    114

    Theft : श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोटार सायकल चोरून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद (Imprisoned) केली. त्यांच्याकडून तब्बल १६ लाख रुपयांच्या १८ मोटारसायकली पोलिसांनी (Police) हस्तगत केल्या आहेत. मोटारसायकल चोरी (Theft) करणारे सर्व चोर हे श्रीरामपूर येथीलच आहेत. या चोरांनी चक्क एका पोलीस निरीक्षकाची दुचाकी चोरली होती. 

    ९८ हजारांचा माल हस्तगत (Theft)

    श्रीरामपूर शहर आणि परिसरात तसेच नगर जिल्ह्यात ठिकठिकाणांहून मोटार सायकल चोरीच्या घटना नेहमी घडत असल्याचे पुढे येते. खंडाळा येथील शेतकरी अमोल बोरकर यांची १२ जानेवारीला मोटार सायकल चोरीला गेली होती. त्याचा तपास शहर पोलीस करीत होते. हा तपास करताना ऋषिकेश कैलास जाधव (रा. सूतगिरणी फाटा, श्रीरामपूर) याचे संशयित म्हणून नाव पुढे आले. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने दिलीप मोहन आढाव (वय ५२, रा. आगाशेनगर, दत्तनगर, श्रीरामपूर), किरण संतोष मोरे (वय १९, रा. सूतगिरणी, रमानगर, श्रीरामपूर) यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचे ३०० किलो अद्रक, ७० हजार रुपयांची मोटारसायकल, १० हजार रुपये किंमतीची पानबुडी असा ९८ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला.

    ११ मोटार सायकली जप्त (Theft)

    श्रीरामपूरसह नगर शहर व इतर ठिकाणच्या मोटारसायकली आणि मोपेड चोरल्याची त्यांनी कबूली दिली. या चोरीत आपल्याबरोबर दानिश महंमद सय्यद (रा. इदगाह मैदान, श्रीरामपूर), गौरव बागूल (रा. रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर), संदीप सुडगे (रा. रमानगर, दत्तनगर, श्रीरामपूर) हेही सहभागी असल्याची कबुली दिली. यातील आरोपी दानिश हा मालेगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याने सांगितले की, चोरीच्या मोटारसायकली मामा रियाज हसन उद्दीन शेख (रा. छोटा कब्रस्थान जवळ,आझादनगर, मालेगाव, जि. नाशिक) यांच्यामार्फत विक्री करण्यासाठी मालेगावला आल्याची कबुली दिली. पोलिसांनी या मामाच्या राहत्या घरून ११ मोटार सायकली जप्त केल्या. त्यानंतर आरोपींना दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

     
    सर्वसामान्य लोकांच्या मोटारसायकली सर्रास चोरीला जातात. मात्र एका पोलीस निरीक्षकाचीही मोटारसायकल या टोळीने चोरली होती. तत्कालीन पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण यांची ९५ हजार रुपयांची मोटारसायकल तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या चोरट्यांनी चोरून नेली होती. पोलिसांनी पकडलेल्या या टोळीमध्ये ही मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here