The Kashmir Files Box Office Collection : ‘द कश्मीर फाइल्स’ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

439

The Kashmir Files Box Office Collection Day 7 : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाने रिलीजच्या 7व्या दिवशी 18.05 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 100 कोटींचा व्यवसाय केल्याची माहिती विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत दिली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ हा सिनेमा 650 स्क्रीन्सवर पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला होता. पण आता हा सिनेमा चार हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक बिग बजेट सिनेमांना या सिनेमाने मागे टाकले आहे.

काश्मिरी पंडितांवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर चांगलीच कमाई केली आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे.  या सिनेमात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आता Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here