The Crew Poster :‘द क्रू’ मध्ये करीना, क्रिती व तब्बू झळकणार; पोस्टर रिलीज

    118

    नगर : बॉलिवूड मधील तीन दिग्गज अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘द क्रु’ असं या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच राजेश कृष्णन (Rajesh Krushnan) दिग्दर्शित ‘द क्रु’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाले आहे. करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन या तिघीही पहिल्यांदाच एकत्रित स्क्रिन शेअर करणार आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये या तिघींचाही फर्स्ट लूक (First Look Relese) पाहायला मिळत आहे.

    करीना, तब्बू आणि क्रितीच्या ह्या नव्या लूकवर चाहते घायाळ (The Crew Poster)

    करीना, तब्बू आणि क्रितीच्या ह्या नव्या लूकवर त्यांचे चाहते फिदा झाले आहेत. रेड कलरच्या एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये या तिघीही सुंदर दिसत आहेत. चित्रपटाचे पोस्टर या तिघींनीही आपआपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना करीना, तब्बू आणि क्रितीने ‘रेडी टू चेक – इन ? टाइम टू फ्लाय’ असं कॅप्शन दिलेलं आहे. अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या दोघींनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर  राजेश कृष्णन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

    २९ मार्चला येणार चित्रपट (The Crew Poster)

    ‘द क्रु’ या चित्रपटाची कथा तीन महिलांवर आधारित आहे. या तिनही महिला एअरलाईन उद्योगातील संघर्ष आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझरलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझ ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here