Thandel Teaser : नागा चैतन्य -साई पल्लवीच्या’थंडेल’चा टिझर प्रदर्शित

    115

    Thandel Teaser : नगर : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) त्याच्या ‘थंडेल'(Thandel) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता ‘थंडेल’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. नागा चैतन्यच्या थंडेल सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये या अभिनेत्याची ओळख मच्छिमार म्हणून करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या सिनेमात नागा चैतन्यसोबत अभिनेत्री साई पल्लवीची (Sai Pallavi) झलक पाहायला मिळाली आहे.

    टीझरमध्ये दिसत आहे की,नागा चैतन्य समुद्रमार्गे भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचतो. ज्यासाठी त्याला पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतले आहे. नागा चैतन्य कराची तुरुंगात आहे, पण त्याचा आत्मविश्वास अजिबात कमी होत नाही. जेव्हा पाकिस्तानी अधिकारी भारताबद्दल चुकीचे बोलतात तेव्हा नागा चैतन्य त्यांना ठणकावून सांगतो की,”पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झालेला छोटा तुकडा आहे. भारत माता की जय!”

    थंडेलच्या टीझरमध्ये अभिनेत्री साई पल्लवी शेवटी दाखवली आहे. ती नागाच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहे. साई पल्लवीला टीझरमध्ये पाहताच प्रेक्षकांना आनंद झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जबरदस्त व्हिज्युअल आणि ठोस संवादांसह चित्रपटाची थीम आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहे.चंदू मोंदेटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे,असे दिसते.

    नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्या २०२१ च्या यशस्वी ‘लव्ह स्टोरी’ सिनेमानंतरचा ‘थंडेल’ हा दुसरा सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती गीता आर्ट्स अंतर्गत बानी वास यांनी केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते देवी श्री प्रसाद यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘थंडेल’च्या प्रदर्शनाची तारीख मात्र अजून समोर आलेली नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here