tension : तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीवरूनच तंटा

    153

    श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील १५ ऑगस्टनिमित्त तहकूब झालेली ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीवरूनच तंटा (tension) झाला. सरपंच महेंद्र साळवी यांनी कुठलीही निवड झाली नसल्याचे सांगितल्यामुळे या वादावर पडदा पडला. १५ ऑगस्टनिमित्त घेण्यात येणारी ग्रामसभा (Gramsabha) ३१ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. परंतु कोरम अभावी ती तहकूब करण्यात आली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच (Sarpanch) महेंद्र साळवी होते. सुरुवातीस ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले. त्यानंतर शासनाच्या विविध योजनाबाबत चर्चा करण्यात आली.

    १५ व्या वित्तआयोगांतर्गत सन २०२४-२५ च्या आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली. स्री जन्माचे स्वागत करुन गाव बालविवाह मुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. ऐनवेळी येणाऱ्या विषयात चंद्रकांत नाईक यांनी तंटामुक्त अध्यक्ष पदाकरिता प्रकाश जाजू यांच्या नावाची सूचना मांडली. त्या सुचनेस ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक हे अनुमोदन देत असतानाच गावकरी मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. हा विषय विषय पत्रीकेवर नसताना घेण्याचे कारणच नाही. तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांनाच आम्ही मुदतवाढ दिल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही गटाकडून गदारोळ सुरु झाला. त्यावर तोडगा काढत सरपंच महेंद्र साळवी यांनी हा विषय विषयपत्रीकेवर घेवुनच निवड करु, असे सांगितले. त्यानंतरही प्रफुल्ल डावरे व चंद्रकांत नाईक यांच्यात खडाजंगी झाली. नेते मंडळीनी मध्यस्थी करुन दोघांनाही शांत केले.

    यावेळी मारोतराव राशिनकर यांनी भंडारदरा धरणातून केटीवेअर बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे, तसेच गावात प्लॅस्टीक बंदी करण्यात यावी अशी सूचना मांडली. त्यास प्रकाश कुर्हे यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेस जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, सदस्य रवींद्र खटोड, भरत साळूंके, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, रमेश आमोलीक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, दत्ता कुर्हे, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, महेश कुर्हे, अशोक प्रधान, वैभव कुर्हे, दादा कुताळ, प्रसाद खरात, सचिन अमोलीक, कामगार तलाठी पी बी सुर्यवंशी, गोपी दाणी, अरुण अमोलीक, एकनाथ नागले, पुरुषोत्तम भराटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here