
नगर : राज्यात शिक्षकांचा (teachers) प्रश्न गंभीर हाेत चालला आहे. अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरती (recruiting) झालेली नाही. त्यातच अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांमध्ये संताप निर्माण झाला आहे, तरी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावावे, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
शहरात कार्यक्रमानिमित्त आलेले बावनकुळे यांची शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सदर प्रश्नी चर्चा केली. यावेळी शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष प्रा. सुनील पंडित, विभाग अध्यक्ष शरद दळवी, प्रांतसदस्य सुनील सुसरे, शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, कार्यवाह शिवाजी घाडगे आदी उपस्थित हाेते.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारी व खासगी शाळामधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. खासगीकरणाच्या शासन निर्णयाने निर्माण झालेला असंतोष याबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. अनेक वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नव्याने भरतीच झालेली नाही. त्यामुळे जवळपास लाखाच्या पुढे पदे रिक्तच आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.