यंदाचा विश्वचषक भारतीय क्रिकेट संघासाठी तसा खास नसल्याचंच दिसून येत आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने पुढील फेरीच्या भारताचा प्रवेश अवघड झाला आहे. पण अजूनही आशा शिल्लक असल्याने भारतीय संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्यान्वयेच आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होऊ शकतो.
तर भारत पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नाणेफेक जिंकलेल्याने विराटने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय़ अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी बरोबर करु दाखवला. ज्यामुळे स्कॉटलंडला संघ केवळ 85 धावांमध्ये सर्वबाद झाला आहे. आता भारतासमोर केवळ 86 धावांचे आव्हान आहे.




