ST Workers : कोणाच्या नादी न लागता ST कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावं, अन्यथा… : अनिल परब

395

Anil Parab on ST Workers : गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आज अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. दरम्यान, यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत सातवेळा कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली होती. आता हायकोर्टानं त्यांना कामावर परतण्याचे आदेश दिलेत. 22 तारखेपर्यंत त्यांना संधी दिली आहे. 22 नंतर जे हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईसाठी आम्हाला मोकळीक असेल असे परब म्हणाले.

आत्तापर्यंतच्या सर्व कारवाया मागे घेतल्या आहेत. कोर्टात तसे सांगितले आहे. जे गुन्हे दाखल झालेत, ती प्रक्रिया सुरुच राहील. २२ नंतर जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाईसाठी आम्हाला मोकळीक असेल असे परब म्हणाले. विलिनीकरण शक्य नाही. कामगारांचा व एसटीचा तोटा झाला असल्याचे परब म्हणाले. पेन्शन व ग्रॅच्युटी आम्ही देतच आलो आहे. काही कारणामुळं कोरोनामुळं केवळ मागेपुढे झाली असेल ती सुरळीत करु असेही परब म्हणाले. कामगारांचे नुकसान कोणी भरुन देणार नाही. यातून त्यांनी धडा घेतला असेल. आता कामावर परत यावं. कोणाच्या नादाला लागू नये असेही परब म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. एसटी कामगारांना कामावरून काढू नका. सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र थेट कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याचं साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं एसटी महामंडळाला केली आहे. यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे आज सकाळी 10 वाजता यावर पुन्हा सुनावणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here