ST Bus : एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयासमोर धरणे; विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने

    132

    ST Bus : नगर : एसटी (ST) महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले व स्वेच्छा निवृत्ती (Voluntary retirement) घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन (Pension) व इतर देयके दोन ते तीन वर्ष उलटून देखील मिळाले नाही, त्यामुळे राज्य परिवहन (State Transport) निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागातर्फे आज एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

    सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने (ST Bus)

    थकित देयके मिळण्यासाठी व प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी एसटीच्या सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, जिल्हा सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर आदी उपस्थित हाेते. सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचा आर्थिक प्रश्‍न बिकट बनला आहे.

    पेन्शन प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याची मागणी (ST Bus)

    जे कर्मचारी एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले त्यांना पेन्शनचा लाभ सुरु झालेला नाही. तर ज्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली अशांना अद्याप पर्यंत पैसे मिळालेले नाहीत, आदींबाबत जाणून-बुजून त्रास देण्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर चालू होणारी पेन्शन प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन एसटी महामंडळाचे विभागीय कामगार अधिकारी एकशिंगे यांना देण्यात आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here