ST : आता दंडात्मक ‘स्वच्छता’; एसटी महामंडळाची माेहीम लवकरच सुरू हाेणार

    189

    नगर : एसटी (ST) महामंडळाच्या वतीने सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्वच्छ, सुंदर बसस्थानक मोहीम सुरू आहे. या माेहिमेदरम्यान एसटी गाड्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून एसटी गाड्यांची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर निश्चित करून प्रतिबस ५०० रुपये दंड (Penalty) ठाेठावण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

    आता बसमधील अस्वच्छतेवर एसटी महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. एसटीच्या स्वच्छतेसाठी वारंवार लेखी तक्रारी एसटी महामंडळाकडे प्राप्त झाल्या हाेत्या. त्यानुसार एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची असणार आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    एसटी बस तपासणीसाठी मुख्यालयाकडून ६० वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाला महिन्यातून १५ बसची तपासणी करून त्यांना गुण द्यावे लागणार आहेत. कमी गुण असलेल्या बसच्या आगार व्यवस्थापकाला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here