Snowfall : जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती

370

Snowfall in Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. एका दिवसापूर्वी अनंतनाग ते किश्तवाड जिल्ह्यात पायी प्रवास करताना बेपत्ता झालेल्या सहा जणांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी बचाव मोहीम सुरू केली आहे. बुधवारी जोरदार बर्फवृष्टी होत असताना सहा जणांनी यात्रेला सुरुवात केली. काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांचा शोध घेण्यासाठी तीन बाजूंनी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक लोक बर्फवृष्टीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अमीर अली यांनी सांगितले, “मॉर्गन टॉप येथे बेपत्ता झालेल्या सहा जणांना शोधण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.” “SDM तहसीलदार, मेड आणि NHIDCL चे अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्नो कटर मशीन आणि जेसीबीसह एक पथक रस्त्याने पुढे जात आहे. लष्कराची बचाव पथके आणि स्थानिक स्वयंसेवकांची आणखी एक टीम पायी जात आहे.” अधिकाऱ्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर बचाव पथके सध्या लारकीपोरा येथे तयार आहेत आणि हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत.

वारवणचे सहा लोक अनंतनागहून मार्गन टॉपमार्गे पायी निघाले होते. वारवणला जाण्यासाठी दुर्गम मॉर्गन टॉपवरून जावे लागते, जिथे उन्हाळ्यातही बर्फाची वादळे येतात. मॉर्गन टॉप या नावाचा अर्थ मृत्यूचा डोंगर असून या भागात बर्फाच्या वादळात अडकून लोकांना याआधीही जीव गमवावा लागला आहे. काश्मीर खोऱ्यात विशेषतः दक्षिण भागात बुधवारी जोरदार बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे लोक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, बेपत्ता लोकांची माहिती अद्याप मिळालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here