
Shri Kashi Vishwanath: श्रीगोंदे : तालुक्यातील ढोरजा येथील तीर्थक्षेत्र (A place of pilgrimage)म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री काशी विश्वनाथ देवस्थानच्या रस्त्यासाठी आमदार बबनराव पाचपुते (MLA Babanrao Pachpute) यांनी ३ कोटी ७५ लाख निधी (Funds) दिल्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती सरपंच अमोल कोहक यांनी दिली.
श्री काशी विश्वनाथ देवस्थान परिसरात प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत ४ कोटी ५५ लाखाचे विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत. यात सुसज्ज असे मंगल कार्यालय, भक्तनिवास, दर्शन रांग इमारत, प्रसादालय, गार्डन,नदी घाट, सभा मंडप, पेव्हींग ब्लॉक,पाणी, पिण्यासाठी पाण्याची टाकी असे अनेक कामे पुर्ण झाले आहेत. या ठिकाणी येणांऱ्या भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर सुख सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्री काशी विश्वनाथ देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर अनेक भाविक तसेच पर्यटक येत असतात. देवस्थानच्या विविध विकास कामामुळे येथील परिसराचा कायापालट झालेला आहे. परंतु या ठिकाणी येण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. आमदार बबनराव पाचपुते यांनी ३ कोटी ७५ लाख निधी दिल्यामुळे देवस्थानकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याचे कोहक यांनी सांगत निधी मिळवण्यासाठी रावसाहेब वाणी, माणिक आप्पा व्यवहारे, बाबासाहेब बारगुजे,अमोल कोहक, पांडुरंग व्यवहारे तसेच सर्व विश्वस्त यांनी पाठपुरावा केला.



