कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी संगीतकार श्रवण पत्नीसमवेत कुंभमेळ्यात (Kumbha Mela) गेले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर पप्पांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी नुकतेच ते कुंभमेळ्यातून परतले होते.’
मुंबई : संगीतकार श्रवण राठोड (Shravan Rathod) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. श्रवण यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा संजीव यांनी अशी काही माहिती दिली आहे की, ज्यामुळे सर्वचजण थक्क झाले आहेत. त्यांच्या मुलाने सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी संगीतकार श्रवण पत्नीसमवेत कुंभमेळ्यात (Kumbha Mela) गेले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर पप्पांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वी नुकतेच ते कुंभमेळ्यातून परतले होते.
संजीव राठोड म्हणाले की, ‘कुंभमेळ्यातून परत आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.’ संजीव म्हणाले, ‘आमच्या कुटुंबाला इतका त्रास सहन करावा लागेल असे आम्हाला कधी वाटले नव्हते. माझ्या वडिलांचे निधन झाले, मी आणि माझी आई कोरोना पॉझिटिव्ह आहोत, माझा भाऊही देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तो घरीच अलगीकरणात आहे. परंतु, वडिलांच्या मृत्यूमुळे त्याला वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.’