
Shivaji Doifode: नेवासा : पोलिसांच्या (Police) वर्दीच्या आतही माणूसकीचा झरा असतो. माञ चोर,भामट्यांसाठी हा झरा नसून सज्जनांना साथ तर गुंडाना लाथ ही भूमिका पोलिसांची नेहमीच ठरलेली असते,असं प्रतिपादन नेवासा पोलीस ठाण्याचे (Newasa Police Station) पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव (Balaji Dedgaon) येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक -पालक मेळाव्याप्रसंगी (Teacher-Parent meeting) ते बोलत होते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना डोईफोडे म्हणाले की, पोलीसांबद्दल मुलांच्या मनामध्ये असलेली भिती दुरु झाली पाहिजे. वर्दीच्या आतही एक माणूस असतो. पोलीसही समाजशिल प्राणी असून चांगल्या गोष्टींसाठी वर्दीतील पोलीस सदैव जागृत असतो. ऊन,वारा,पाऊस,सणवार न बघता जनतेच्या रक्षणासाठी नेहमी पोलीस कर्तव्यावर असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी विद्यार्थी व पालकांना आपल्या भाषणात खिळवून ठेवले.
यावेळी अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक डोईफोडे यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शाळाबाह्य टारगटावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी डोईफोडे यांनी पालक व ग्रामस्थांना दिले. मुलींनी कुठल्याही प्रकारची भिती मनात न ठेवता पोलीस तुमच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या पालक – शिक्षक मेळाव्यानिमित्त माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पावन महागणपतीचे अध्यक्ष संभाजीराव मुंगसे, डॉ.पोपट तांबे, श्रीकांत हिवाळे,पाटबंधारे विभागाचे रावण ससाणे, चेअरमन योसेफ हिवाळे, शरद हिवाळे, देविदास रक्ताटे, भारत औटी, शाळेचे पर्यवेक्षक चामुटे,तज्ञशिक्षक डी.जी कदम, शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने पालक यावेळी उपस्थित होते.



