मुंबई : शरद पवारांकडून राज्यभरातील विविध ब्राह्मण संघटनांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार हे ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर काही जणांकडून व्यक्त केली जातात याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. तर या बैठकीला आनंद दवेंच्या ब्राह्मण महासंघासह काही संघटनांचा विरोध आहे. मात्र इतर संघटना चर्चेसाठी तयार आहेत.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतची नाराजी शरद पवारांकडे मांडणार असल्याच ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटलय. तर दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतांबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.




