Shane Warne Passes Away : फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

427

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia)  माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं निधन  झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack)  झटक्याने थायलंड (Thailand)  येथे निधन झाले आहे.  दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे. 

क्रिकेटर शेन वॉर्न यांनी काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शेन वॉर्न यांनी युक्रेनच्या बाजूने एक संदेश दिला होता आणि रशियाच्या कारवाईला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. 

जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत.  सचिनचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा शेन भारतीय क्रिकेटमध्येही चांगलाच सक्रीय होता. सर्वात पहिली आयपीएल ट्रॉफी शेन कर्णधार असणाऱ्या  राजस्थान रॉयल्सनेच उचलली होती. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here