Shaitaan Movie: अजय देवगणच्या ‘शैतान’मधील पहिलं गाणं रिलीज

    121

    नगर : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) त्याचा आगामी चित्रपट ‘शैतान’मुळे (Shaitaan Movie) खूप चर्चेत आहे. अजय या सुपर नॅच्युरल थ्रिलर चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. नुकतच या चित्रपटातील ‘खुशियां बटोर लो’ हे गाणं रिलीज झाले आहे. या गाण्याला अवघ्या काही वेळातच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

    ‘खुशियां बटोर लो’ गाण्याला चाहत्यांकडून चांगली पसंती (Shaitaan Movie)

    ‘शैतान’ चित्रपटातील ‘खुशियां बटोर लो’ या गाण्यामध्ये अजय देवगण आणि ज्योतिका आपल्या मुलांसोबत मजा-मस्ती करताना आणि हसताना दिसत आहेत. अजय देवगणने हे गाणं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हे गाणं शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कुटुंबासोबत असताना प्रत्येक क्षण मौल्यवान आणि सुंदर असतो!’ अजय देवगणच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

    विकास बहलने केले ‘शैतान’ चित्रपटाचे दिग्दर्शन (Shaitaan Movie)

    ‘खुशियां बटोर लो’ हे गाणं गायक जुबिन नौटियाल यांनी गायले आहे.तर बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अजय देवगण फिल्म्स आणि पॅनोरमाच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर विकास बहलने ‘शैतान’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जादूटोणा, सस्पेन्स आणि गडद जगावर आधारित हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here