Sant Gadge Baba: संत गाडगेबाबांनी अंधश्रद्धा व अस्वच्छता दूर करण्यासाठी आयुष्य वेचले : स्वाती पुरे

    138

    श्रीरामपूर : कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा (Superstition) आणि अस्वच्छता (Unsanitary) दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी (Gadge Baba)आपले आयुष्य वेचले आहे, असं वक्तव्य ग्रंथपाल स्वाती पुरे (Librarian Swati Poore) यांनी केले. श्रीरामपूर नगर परिषदेच्या(Shrirampur Municiple Council) वतीने लोकमान्य टिळक वाचनालयात संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पुरे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले.

    डावखर रोडवरील हनुमान मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एम.वी.रेड्डी, कांचन चावरे, सुमन रायकर, रुक्मिणी क्षत्रिय, राजेश जेधे, विजय झिंगारे ,सूर्यभान सातदिवे, स्वप्निल माळवे ,साक्षी आहिरे, सिद्धार्थ गवारे, सोमनाथ देवकर ,कमल गवारे, सीमा पाखरे ,अर्चना पाठे, ज्ञानेश्वर चव्हाण ,दीपक मंडवे, अमोल गायकवाड,सचिन जेधे, गणेश शिरसागर,आस्मा शेख, प्राची जेधे,संजय जाधव आदी उपस्थित होते.

    यावेळी ग्रंथपाल स्वाती पुरे म्हणाल्या की, स्वतःच्या आयुष्यात आलेल्या खडतर जीवनाचा अनुभव इतरांच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी आयुष्यभर लोकांना उपदेश करणारे गाडगेबाबा स्वच्छतेचे आग्रही होते. लहानपणापासून त्यांनी निरीक्षण करून आपल्या आजूबाजूचे दुःख, दैन्य, दारिद्र्य यांचा सखोल अभ्यास केला. पुढे जीवनभर समाजाची घाण, कचरा काढून पोट भरले व इतर वेळेला समाजाला शहाणे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असं त्यांनी यावेळी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here