Sanjay Raut on Elections : “भाजपच्या यशात मायावतींचं योगदान, पंजाबमधील भाजपच्या पराभवावर राऊत म्हणाले…

470

Sanjay Raut : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला (BJP) मोठे यश मिळाले असले तरी भाजपच्या यशात मायावतींचं (Mayawati) योगदान आहे, तसेच पंजाबच्या (Punjab elections 2022) जनतेनी भारतीय जनता पार्टीला अत्यंत वाईट पद्धतीने  नाकारले आहे. पंजाबमधील पराभावावर मार्गदर्शन करा.  हार-जीत होत राहते, आम्हीही तुमच्या आनंदात सामिल आहोत. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. यावर संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. 

मुंबई पालिकेवर भगवा झेंडा कायम राहणार गेले ५० वर्षे महानगरपालिका निवडणुक लढतोय.  उत्तर प्रदेश, गोवा, यांरख्या निवडणुकांचा महापालिका निवडणुकांशी काहीही संबंध नाही, मुंबई पालिकेवर भगवा झेंडा कायम राहणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. 

केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दवाबाखालीच काम करतेयअत्यंत चुकीच्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणा काम करतेय. एकाच पक्षातील एकाच आघाडीचे लोकं टार्गेट केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या दवाबाखालीच काम करतेयं. या मतीसी महाविकास आघाडी काम करतेय   पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र याबद्दल बोललं पाहिजे. हे मी बोलल्यानंतर माझ्या घरावर छापा पडला तर मी घाबरत नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस यांना फक्त राजकीय कारणांसाठीच हल्ले होत आहेत. सत्य सांगण दबाव नाही, सत्य ऐकण्याची तुम्ही तयारी ठेवा.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे सर्व मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने करिष्मा केला आहे. काल रात्री उशीरापर्यंत काही मतदारसंघात मतमोजणी चालू होती. अखेर सर्व मतदारसंघातील मतमोजणी अखेर पूर्ण झाली आहे. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. पाहुयात कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा….

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश : एकूण जागा :  403

  • भारतीय जनता पक्ष : 255
  • समाजवादी पक्ष : 111
  • अपना दल (सोनेलाल) :  12
  • राष्ट्रीय लोकदल : 8
  • सुहेलदेव भारतीय समाज पक्ष : 6
  • निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल : 6
  • काँग्रेस : 2
  • जनसत्ता दल लोकशाही : 2
  • बहुजन समाज पक्ष : 1
  • आम आदमी पार्टी : 92
  • बहुजन समाज पक्ष : 1
  • भारतीय जनता पक्ष : 2
  • अपक्ष : 1
  • काँग्रेस : 18
  • शिरोमणी अकाली दल : 3

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here