Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार योजनांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मार्गी लावा; अन्यथा आंदोलन

    112

    Sanjay Gandhi Niradhar Yojana : कोपरगाव: संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana), इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेले ११०० हून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात धूळ खात पडले आहेत. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना बैठक घेण्यास वेळ मिळत नसल्यामुळे सदर योजनांचे लाभार्थी शासकीय अनुदानापासून (Govt grant) वंचित आहेत. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे ( Sahakar Maharshi Shankarrao Kolhe Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी दिला. 

    जनतेचे प्रश्न सोडविण्यास चालढकलपणा (Sanjay Gandhi Niradhar Yojana)

    कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली जाते. त्यानुसार सोमवारी (५ फेब्रुवारी) विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कोल्हे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास अधिकारी चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला. तसेच आमदार काळे यांनी केलेल्या दुर्लक्षाने त्यांच्या निव्वळ फ्लेक्सबाजी कारभारावर कोल्हे यांनी टीकेची तोफ डागली.

    यांची उपस्थिती (Sanjay Gandhi Niradhar Yojana)

    या बैठकीस अप्पर तहसीलदार विकास गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, नायब तहसीलदार कुलथे, राजू चौरे, भाजप नेते शरद थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, शहराध्यक्ष दत्ता काले, केशवराव भवर, मच्छिंद्र टेके, संभाजीराव रक्ताटे, रवींद्र पाठक, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सरपंच रवींद्र आगवन, दीपक चौधरी, अनुराग येवले, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, उपसरपंच भगवानराव चव्हाण, जितेंद्र रणशूर, शफिकभाई सय्यद, रवींद्र रोहमारे, सतीश रानोडे, भाऊसाहेब वाघ, गोरख टुपके आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here