Sandalwood : चंदन तस्करी करणारा जेरबंद; चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत

    157

    कर्जत: आंबीजळगाव (ता.कर्जत) शिवारात खातगाव रोडला स्कॉर्पिओ वाहनात चोरीचे चंदन (Sandalwood) वाहतूक होणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना (Police) मिळाली. त्यावर छापा (raid) टाकला असता तीन लाख ८३ हजार रुपये किमतीची ९५ किलो वजनाची चंदनाची गाभा असलेली लाकडे आढळून आली. यावेळी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरा व्यक्ती मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.

    कर्जतचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली की, कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील खातगाव रोडला काही इसम स्काॅर्पिओ गाडीमध्ये चंदन चोरुन घेवुन जाणार आहेत. पोलीस निरीक्षक बळप यांनी तात्काळ गस्तीवर असणाऱ्या पथकास याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. सदरच्या ठिकाणी पोलीस पथकास दोन इसम स्कॉर्पिओ गाडीजवळ उभे दिसले. पोलीस पथक आपल्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच गाडी सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना वाहनचालकास शिताफीने पकडण्यात पथकास यश आले.

    वाहनचालकांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव महेश हनुमंत गुंड (वय २८, रा. नारायण चिंचोली ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे सांगितले. तसेच त्याचा पळून गेलेला साथीदाराचे नाव दादा निकत (रा. आंबीजळगाव, ता. कर्जत) असे सांगितले. पंचासमक्ष वाहनांची तपासणी केली असता तीन लाख ८३ हजार रुपये किमतीची ९५ किलो चंदनाची तासलेली गाभ्याची लहान मोठ्या गोण्यात भरलेली व तासुन निघालेली छिलके मिळून आले. यासह ४ लाख ५० हजार रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी असा एकूण ८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल कर्जत पोलिसांनी हस्तगत केला. ताब्यातील आरोपी वाहनचालक महेश गुंड याने दादा निकत याच्याकडून हा मुद्देमाल विकत घेतला असल्याचे पोलिसांना सांगितले. महेश गुंड यास चंदन चोरीच्या गुन्हयात अटक करुन त्यास न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरच्या आरोपीकडून कर्जत तालुक्यातील चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here