Sambhaji Bhide: 6 जूनचाशिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा… संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य !

    337

    त्यांनी 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. यासोबतच रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

    शिवराज्याभिषेक सोहळ्यावर प्रश्नचिन्ह

    संभाजी भिडे यांनी म्हटले की, 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा हा राजकारणासाठी वापरला जात आहे. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम तिथीप्रमाणेच पार पडले पाहिजेत. “हा सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला हवा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्याने अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

    वाघ्या पुतळ्यावरूनही वाद

    रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही भिडे यांनी आपले मत मांडले. “वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, पण त्याच्यावरून राजकारण करू नये,” असे ते म्हणाले. त्यांनी याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. “जे इतिहास संशोधक वाघ्याबद्दल बोलतात, त्यांचे दावे कितपत खरे आहेत, याची तपासणी व्हायला हवी,” असे भिडे यांचे म्हणणे आहे. या वक्तव्याने इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

    जयंत पाटील यांनी केला निषेध

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मृतींवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे,” असे पाटील म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, “लहानपणापासून आपण ज्या इतिहासाला मानतो, तो मोडण्याचे आणि नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. अशा लोकांची दृष्टी तपासण्याची गरज आहे.” पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळातही या वादाला नवी धार चढली आहे.

    सरकार काय निर्णय घेणार?

    शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी या वादावर सरकार लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले. “शिवराज्याभिषेक हा 6 जून रोजी साजरा होतो, यावर कोणताही वाद नको. तारखेवर बंधन घालणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही दोन मतप्रवाह असल्याचे त्यांनी मान्य केले. “यावर एक समिती नेमली जाईल आणि मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील,” असे शिरसाट यांनी नमूद केले.संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रातील लाखो लोकांसाठी अभिमानाचा विषय आहे. त्यामुळे या सोहळ्यावर प्रश्न उपस्थित करणे अनेकांना खटकले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here