
Saint Sadguru Godad Maharaj : कर्जत : येथील ग्रामदैवत श्री संत श्रेष्ठ सदगुरु गोदड महाराजांचा (Saint Sadguru Godad Maharaj) १८६ वा पालखी सोहळा (Palkhi ceremony) मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कर्जत बाजारतळ येथे शिपी आमटी महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. संध्याकाळी ७ वाजता गोदड महाराज मंदिरापासून पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. यावेळी हरिनामाच्या गजराने शहर दुमदुमले होते.
धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन (Saint Sadguru Godad Maharaj)
ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या १८६ व्या संजीवन समाधी पालखी उत्सव सोहळ्यानिम्मित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तर गुरुवारी भव्य पालखी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. दुपारी पालखी उत्सव सोहळ्यानिम्मित लक्ष लक्ष शिपी आमटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. यासाठी हजारो हात दिवस रात्र राबले.
ठिकठिकाणी पालखीचे स्वागत (Saint Sadguru Godad Maharaj)
संध्याकाळी ठीक ७ वाजता पालखी उत्सव सोहळा गोदड महाराज मंदिरापासून सुरुवात झाली. यावेळी संत सदगुरु गोदड महाराज आणि हरिनामाच्या गजराने भाविकांनी मंदिर परिसर दणाणून सोडला होता. पालखी पुढे परिसरातील शेकडो लहान-मोठ्या दिंड्या टाळ, वीणा, मृदुंग घेत भक्तिरसात न्हाऊन निघाले. आरती संपन्न झाल्यानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणाकरीता मार्गस्थ झाली. यावेळी पालखी मार्गावर स्वागतासाठी फुलांची आरास, रांगोळी आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. यासह गोदड महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुधवार आणि गुरुवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.