Saibaba : श्री साईबाबा संस्थानला राम मंदिराचे निमंत्रण

    123

    Saibaba : राहाता : श्री राम मंदिर (Shri Ram Temple), अयोध्‍या न्‍यासाचे वतीने श्री रामलल्‍ला मुर्ती प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका (invitation card) श्री साईबाबांचे चरणी अर्पण करण्यात आली. श्री साईबाबा (Saibaba) संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेकडे ही पत्रिका सुपुर्द करण्यात आली.

    दरम्यान, रामनगरी अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. २२ जानेवारी हा अयोध्या नगरीसह देशभरात सर्वत्र उत्सवाचा दिवस असणार आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रित सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जवळपास आठ हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपर्क विभाग कार्यालयाचे प्रमुख प्रणव पवार यांनी शिर्डीतील श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डी गॅझिटीअरचे लेखक प्रमोद आहेर, विहपचे सुरेंद्र महाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here