Russia Ukraine War : रशियाने ब्रिटनशी घेतला बदला, सर्व ब्रिटीश विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले

332

Russia Close Airspace for British Airlines: रशियाने युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine War) केला असून जगभरातील देश रशिया आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्यावर टीका करत आहेत. मात्र असे असतानाही रशियाने हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यानंतर सर्व देशांनी रशियावर (Russia) वेगवेगळे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. रशियाला विरोध करत ब्रिटननेही तिथल्या सर्व फ्लाइट्सवर बंदी घातली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता रशियानेही तेच केले आहे.

ब्रिटीशांच्या सर्व विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केलेरशियाने ब्रिटीश एअरलाइन्सच्या सर्व विमानांना त्यांच्या जमीनीवर उतरण्यास बंदी घातली आहे. सर्व प्रकारच्या उड्डाणांवर ही बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर रशियाने आपल्या हवाई हद्दीतून ब्रिटीश विमानांना बंदी घातली आहे. म्हणजेच, ब्रिटीश उड्डाणे यापुढे रशियन हवाई क्षेत्रात उड्डाण करू शकत नाहीत.

सर्व प्रकारच्या उड्डाणांवर बंदीरशियन सरकारच्या एव्हिएशन कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, यूकेशी कोणत्याही प्रकारचा संबंध असलेली उड्डाणे, मग ती रशियन उड्डाणे असोत, वैयक्तिक विमाने असोत किंवा यूकेमध्ये नोंदणीकृत विमाने असोत, सर्वांवर बंदी घालण्यात आली आहे. ते रशियन हवाई क्षेत्र वापरू शकत नाहीत. रशियाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा ब्रिटीश एव्हिएशन ऑथॉरिटीने रशियन फ्लाइट्सबाबत निर्णय घेतला. तेव्हा त्यांना ब्रिटीश फ्लाइट्सवरही बंदी घालावी लागली.

सतत लष्करी कारवाईरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश जारी केले होते. यानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर बॉम्बफेक सुरू केली. ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथेही अनेक जवान शहीद झाले आहेत. हा हल्ला सातत्याने सुरू आहे. तर रशियाला अमेरिका आणि सर्व बड्या देशांनी हल्ला थांबवण्याचा इशारा दिला आहे. रशियालाही लगेचच नाटोकडून युद्धबंदीचा सल्ला देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here