
Rohit Pawar : कर्जत : बारामती अॅग्रोच्या कारभारावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना केंद्रीय इडीने (ED) आज (ता.२४) चौकशीसाठी बोलवले होते. त्याचे तीव्र पडसाद मतदारसंघात उमटले. राजकीय (Political) द्वेषापोटी सदरची कारवाई केली जात असून आमचा नेता लढणारा आहे. कोणाच्या दबावाला घाबरुन स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा (State Govt) समाचार घेतला. मुंबईत देखील ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते ठाण मांडून आमदार पवार यांच्या समर्थनार्थ बसले होते.
बारामती अॅग्रोच्या कारभारावरून चौकशी (Rohit Pawar)

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना केंद्रीय ईडीने बारामती अॅग्रोच्या कारभारावरून चौकशीसाठी आज मुंबई येथे बोलावले होते. सकाळी ठीक १०:३० वाजता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेत खासदार सुप्रिया सुळे-पवार यांच्यासोबत कार्यालयात चौकशीसाठी रवाना झाले. त्यांच्या समर्थनार्थ मतदारसंघातील गावनिहाय कार्यकर्ते वाहनाने मुंबईकडे मार्गस्थ झाले. मुंबई येथील ईडी आणि राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आमदार पवार यांना समर्थन देणारे फलक हाती घेत ठाण मांडून बसले आहेत. आमचा दादा पळणारा नाहीतर लढणारा आहे, ज्याला साथ सह्याद्रीची त्याला भीती कोणाची, जहाँ तुम बुलाओगे वहा मैं आऊंगा या आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हाती घेतले होते.
राजकीय द्वेषापोटी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न (Rohit Pawar)
आमदार रोहित पवार यांनी शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि युवा वर्गाच्या प्रश्नांवर राज्य सरकारसह केंद्र सरकारला संघर्ष यात्रेत धारेवर धरले होते. यात्रेला मिळालेला प्रतिसाद तसेच राजकीय द्वेषापोटी त्यांचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न अशा कारवाईने केला जात असल्याची प्रतिक्रिया मुंबई येथे कार्यकर्त्यांनी दिल्या. कर्जतमध्ये देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात निवेदन देत इडी चौकशीचा निषेध केला.



