Robbery : दरोड्याच्या तयारीत घराबाहेर पडले अन् तुरुंगात जाऊन बसले

    177

    Robbery : नगर : नगर तालुक्यातील वाळुंज येथे दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत दरोडेखोर आले होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने लावलेल्या सापळ्यात ते अडकले. दरोडेखोरांच्या (Robber) टोळीत पाच सराईत गुन्हेगार व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. जेरबंद आरोपींकडून ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

    साईनाथ तुकाराम पवार (वय २२), आकाश गोरख बर्डे (वय २८), विशाल पोपट बर्डे (वय १८), नवनाथ तुकाराम पवार (वय २७), अमोल दुर्योधन माळी (वय १८) व अल्पवयीन मुलगा (सर्व रा. कुरणवाडी, ता. राहुरी), अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील तडीपार व सराईत गुन्हेगार शोधण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. पथकाला माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगारांची टोळी नगर-सोलापूर रस्त्यावरील वाळुंज परिसरात सोमवारी (ता. ८) रात्री येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने मोठ्या चपळाईने आरोपींना जेरबंद केले.

    जेरबंद आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी नावा व्यतिरिक्त काहीही सांगण्यास विरोध केला. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन तलवारी, एक टामी, तीन विवो व एक मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला. आरोपींजवळील मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींवर अवैधरित्या शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेरबंद आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यातील साईराम पवार वर या पूर्वी सहा, अरुण बर्डेवर दोन, आकाश बर्डेवर तीन, विशाल बर्डेवर एक, अमोल माळीवर दोन गुन्हे दाखल आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here