Rajya Sabha Election : अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव, मतदान करता येणार की नाही यावर उद्या तातडीची सुनावणी

387

मुंबई: मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीची परवानगी नाकालल्यानंतर देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर उद्या सकाळी तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आशा कायम आहेत.

शुक्रवारी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने असून एक-एक मत महत्त्वाचं आहे. त्याचमुळे आपल्याला मतदानाची परवानगी मिळावी म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यावर सत्र न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली. त्यानंतर अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या सकाळी तातडीने घेण्यात येणार आहे.

कैद्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचं सांगत ईडीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाला विरोध केला होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी नाकारली होती. आता त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यसभेच्या विजयी उमेदवारांचा कोटा बदललाराज्यसभेतील विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे.सहाव्या जागेसाठी शिवसेना भाजपमध्ये चुरसराज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here