Raj Thackeray : राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं, बाळा नांदगावकरांची पत्रकारांना माहिती

409

Raj Thackeray : राज ठाकरेंना (Raj Thackeray) तसेच बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान हे पत्र स्वत: त्यांना आलं आहे, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली. या संदर्भात त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचेही सांगितले. दरम्यान हे पत्र कोणी लिहलं, कुठून आलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही असे नांदगावकरांनी सांगितले. माझं ठिक आहे, पण राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज ठाकरेंना (Raj Thackeray) तसेच बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत. तसेच या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली असून गृहमंत्री याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बोलले असल्याचे नांदगावकरांनी सांगितले.

राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. प्रत्यक्षात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्रात मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा..राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली होती.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here