
Railway News:- सध्या राज्यामध्ये अनेकछोट्या-मोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत व काही महामार्ग प्रस्तावित आहेत. त्यासोबतच बरेच रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणाचे काम देखील सुरू आहे तर काही नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यात येणार आहेत. या सगळ्या प्रकल्पात मागील जर आपण उद्देश बघितला तर महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणे व दळणवळणाच्या अत्याधुनिक आणि वेगवान सोयी निर्माण करणे ह आहे. बऱ्याचदा आता उपलब्ध असलेल्या मार्गांवरून प्रवास करताना वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला खूप जास्त वेळ लागतो व त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
त्यामुळे असे महामार्ग किंवा रेल्वेमार्गाची उभारणी खूप महत्त्वाची आहे. जर या मुद्याला धरून जर आपण पुणे ते अहिल्यानगर दरम्यानचा सध्याचा प्रवास जर बघितला तर महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वेमार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. चला तर मग आपण या लेखात हा दुहेरी रेल्वेमार्ग नेमका कसा असणार आहे याविषयीची थोडक्यात माहिती बघू.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे ते अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटावी याकरिता या महामार्गाला समांतर दुहेरी रेल्वेमार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या समांतर रेल्वेमार्गाच्या भूमी सर्वेक्षणाचा अंतिम प्रकल्प अहवाल हा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने सादर केला असून 98 किलोमीटरचा हा मार्ग दुहेरी असणार आहे. विशेष म्हणजे या 98 किलोमीटर अंतरामध्ये एकूण 12 रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहेत. हा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर पुणे-अहिल्यानगर प्रवास खूप सोयीचा आणि सुलभ होणार हे मात्र निश्चित.
सध्या या दोन्ही शहरादरम्यान प्रवासाला बसने गेलात तर तीन ते चार तासाचा कालावधी लागतो. परंतु ही रेल्वे सुरू झाल्यामुळे केवळ दीड तासांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे. या रेल्वेमार्गाचे महत्त्व जर पाहिले तर सध्या पुणे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या दौंड स्थानकावरून धावतात. त्यामुळे प्रवासांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच महामार्गाच्या माध्यमातून पुणे ते अहिल्यानगर प्रवास हा वाहतूक कोंडीमुळे खूप जिकिरीचा बनला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा रेल्वेमार्ग खूप फायद्याचा ठरणार आहे.
कुठे असतील रेल्वे स्थानके?
पुणे- अहिल्यानगर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या य दुहेरी रेल्वे मार्गावर लोणी काळभोर, कोलवडी, वाघोली, वढु, जातेगाव, रांजणगाव एमआयडीसी, कोहकडी, सुपे एमआयडीसी, कामरगाव, सास आणि अहिल्यानगर ही प्रस्तावित रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये रांजणगाव आणि सुपे एमआयडीसी हे मुख्य रेल्वे स्थानके असणार आहेत.
किती होईल जमिनीचे संपादन ?
पुणे- अहिल्यानगर दुहेरी रेल्वेमार्गासाठी एकूण 785.898 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे साधारणपणे यामध्ये खाजगी मालकीची 727.9 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे तर सरकारी जमीन 13.016 हेक्टर व वनजमीन 44.956 हेक्टर इतकी लागणार आहे. हा 98 किलोमीटरचा रेल्वेमार्ग असून हवेली, शिरूर तसेच पारनेर आणि अहिल्यानगर या चार तालुक्यातील जमीन संपादित करण्यात येणार आहे व सगळ्यात जास्त जमीन ही शिरूर तालुक्यातून जाणार आहे