Railway Department : रेल्वे विभागाचा निर्णय; तिकीट बुकिंग ते ट्रेन ट्रॅकिंग आता एकाच अ‍ॅपवर

    174

    Railway Department : नगर : भारतीय रेल्वेने (Railway Department) दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक शहर ते खेड्यापर्यंत रेल्वेचे जाळं पसरलं आहे, त्यामुळे प्रत्येकाला चांगल्या सुविधा, सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. इंडियन रेल्वे (Indian Railways) आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक (Book tickets) करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे आणि अशाच अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर (App) उपलब्ध करण्यात येणार आहेत.

    एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी रेल्वे मंत्रालयाने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेची आयटी विंग, म्हणजेच सीआरआयएस या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. नवीन सुपर अ‍ॅपमध्ये रेल मदत, नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टीम, पोर्टरीड, सतर्क, आयआरसीटीसी रेल कनेक्ट, ई-केटरिंग, एअर अशा कित्येक सुविधा इंटिग्रेट होणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूजर्सना वेगवेगळे अ‍ॅप्स घ्यावे लागणार नाहीत. तसंच, लोकांना अधिक चांगला यूजर एक्सपिरियन्स मिळणार आहे. सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचं आयआरसीटीसी अ‍ॅप उपलब्ध आहे. मात्र, इतर गोष्टींसाठी प्रवाशांना विविध अ‍ॅप्स घ्यावे लागतात. नवीन सुपर अ‍ॅप लाँच झाल्यानंतर यूजर्सना केवळ एकच अ‍ॅप पुरेसं असणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here