Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांची पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    95

    नगर :  शिवसेना व राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षांतरबंदी कायदा चिकीत्सा समिती अध्यक्षपदी नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. नार्वेकरांनी ज्या दहाव्या परिशिष्ठाचा आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये वारंवार आधार घेतला आहे, त्याच परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे.

    राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना व राष्ट्रवादीमधील फुटीच्या सुनावणी (Rahul Narvekar)

    मागील सहा महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील फुटीच्या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. अखेर तीन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर १२ जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांनी शिवसेना प्रकरणी निकाल दिला. आता ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यावर सुनावणी चालू आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकरांनी सातत्याने घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा, अर्थात ज्यात पक्षांतरबंदी कायदा व त्यासंदर्भातल्या तरतुदींचा उल्लेख आहे, त्याचा सातत्याने संदर्भ घेतला.

    ओम बिर्लां काय म्हणाले ? (Rahul Narvekar)

    “दहाव्या परिशिष्ठाचा अनेकदा मुद्दा उपस्थित होतो. उत्तराखंडमध्ये सीपी जोशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती. त्यावर व्यापक चर्चा झाली होती. काही विषय आम्ही मांडले होते. आता त्या समितीच्या शिफारशी पुढे नेण्यासाठी आणि त्यांची चिकित्सा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक समिती स्थापन करण्यात आली आहे.दहाव्या परिशिष्ठाच्या नियमावलीची चिकित्सा, संशोधन करून त्याबाबत ही समिती शिफारसी करेल”, अशी माहिती ओम बिर्ला यांनी विधानसभेतील संमेलनात दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here