
Radhakrishna Vikhe Patil : राहुरी : मानोरीतील अॅड. राजाराम आढाव व मनिषा आढाव यांची झालेली हत्या (Murder) ही दुर्दैवी घटना आहे. पोलिसांची (Police) कारवाई योग्य दिशेने चालू आहे. गुन्हेगारांचे बळ वाढू नये. गुन्हेगारांना कडक शासन व्हावे व जलदगती न्यायालयात हा खटला चालविणे बाबतीत पोलिसांना विशेष सूचना देण्यात आले असल्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
पाचही आरोपींना अटक (Radhakrishna Vikhe Patil)
विखे पाटील यांनी अॅड.आढाव कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, यातील पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी अटक केलेली आहे. त्या आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच. सरकारी वकील देण्याबाबत व जलद गती न्यायालयात खटला चालवण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.
आरोपी हा सराईत गुन्हेगार (Radhakrishna Vikhe Patil)
एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून या आधीच्या दोन गंभीर गुन्ह्यात तो निर्दोष कसा सुटला याबाबत फेर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. गुन्हेगारांचे बळ कुठल्याही परिस्थितीत वाढणार नाही, याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, अॅड. तानाजीराव धसाळ आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



