Punjab on Covid19 : पंजाब सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश

585

Punjab on Covid19 :  काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमीलीची घट होताना दिसत आहे. कोरोनाचा धोका कमी झाल्याने देशतील नागरिकांना दिलासा मिळत आहे.  पंजाबमध्ये देखील  परिस्थिती नियंत्रणात आली असून  गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.   या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने राज्यातील कोरोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. बुधवारी (16 मार्च) नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पाडणार नाही.

पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान  16 मार्चला शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी किमान तीन ते चार लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यानुसार सध्या पंजाबमध्ये तयारी सुरू आहे. शपथविधीसाछी 50 नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे. इतर नागरिकांसमोर LEDलावण्यात येणार आहे. शपथविधीसाठी 8 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 

पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाा आहे. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये फक्त 285 अॅक्टिव्ह रुग्ण होते. तर गेल्या 24 तासात पंजाबमध्ये 48 रुग्णांची नोंद झाली आहे. या पैकी 18 ऑक्सिजन सपोर्ट, चार आयसीयू आणि एका रुग्णाला वेंटिवलेटरवर आहे. पंजाबमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.37%  आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील खटकर कलान गावात होणाऱ्या भगवंत मान यांच्या शपथविधी समारंभात एकही व्हीव्हीआयपी पाहुणे नसणार. दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्येही आम आदमी पक्षाने अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे सर्व बडे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here