Pune Accident : पुण्यात शिवशाही बस आणि कंटेरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

1052

Pune Accident : पुण्यात (Pune) एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहक आणि सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय एकनाथ भायदे (रा.मुरुड, वय 52 वर्षे) असं मृत प्रवाशाचं नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला

पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात चालक, वाहक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.

कसा झाला अपघात?शिवशाही बस पंढरपूरहून प्रवाशांना घेऊन पुण्याच्या दिशेने जात होती. ही बस पुणे-सासवड रस्त्यावर आली असताना उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोदामातून निघालेला कंटेनर शिवशाही बसच्या समोर आला आणि जोरदार धडक झाली. अपघातात बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ज्यामुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालक, वाहत आणि प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं.

अपघातानंतर वाहतूक कोंडीअपघातानंतर इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त शिवशाही बस आणि कंटनेरला हटवण्यात आलं. परंतु या दरम्यान अपघातामुळे उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

बुलढाण्यात एसटीच्या कापलेल्या पत्र्यामुळे दोघांचे हात तुटले, एकाचा हात मोडला बुलढाण्यात एसटीच्या निघालेल्या पत्र्यामुळे दोघांनी हात गमावले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पिंपळगाव देवी मार्गावर तीन दिवसांपूर्वी एक विचित्र अपघात झाला होता. एसटी बसचा कापलेला पत्रा लागून दोघाचे हात अक्षरश: तुटले तर एकाचा हात मोडला आहे. मलकापू पिंपळगाव देवी मार्गावर व्यायाम करणाऱ्या करणाऱ्या तरुणाचा हात या पत्र्यामुळे तुटला. तर पुढे शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला एसटीन धडक दिली, ज्यात पत्रामुळे त्याचा हात तुटला. याशिवाय एसटीने एका दुचाकीस्वारालाही धडक दिली होती, ज्यात त्याचा हात मोडला. या प्रकरणी धामणगाव वडे पोलिसांनी एसटी चालकाला अटक करुन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here