Pune : पुणे नगर महामार्गावर विचित्र अपघात; चार जण जागीच ठार

535

Pune News : पुणे नगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्यातील शिक्रापूर येथे  विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन वाहनांच्या या विचित्र अपघातात जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे 24 वा मैल या ठिकाणी भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं नगरच्या दिशेनं जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाला. त्यावेळी पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकनं जोरदार धडक दिली, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांनी या भीषण अपघाताची माहिती तातडीनं शिक्रापूर  पोलिसांना देण्यात आली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

पुणे नगर महामार्गावरील भीषण अपघातात विठ्ठल हिंगाडे आणि रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील लिना निकसे यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नसून जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. अपघातामुळे  महामार्गावर मोठ्या प्रमाणात झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here