
Post Office Scheme :
जर तुम्हाला दुप्पट परतावा पाहिजे असेल तर तुम्ही आता पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला या योजनेमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना आहे.
अशी होईल दुप्पट रक्कमGutuaतुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी 5 लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांत तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळू शकते, जे 2,24,974 रुपये इतके होईल. अशाप्रकारे तुमचे एकूण ५ लाख रुपये पाच वर्षांत 7,24,974 रुपये होऊ शकतात. परंतु तुम्हाला ही रक्कम आता काढण्याची गरज नाही कारण तुम्हाला त्याची एफडी 5 वर्षांसाठी पुन्हा करावी लागणार आहे.
तुमची रक्कम 10,51,175 रुपये होईल, एकंदरीतच तुम्हाला 5 लाख रुपयांवर 5,51,175 रुपयांचे व्याज मिळेल, जे तुमच्या गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त असणार आहे. अशा प्रकारे, तुम्हाला 120 महिन्यांत म्हणजे 10 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होऊ शकते. समजा तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 10 वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला 11,02,349 रुपये व्याज मिळेल. तसेच मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 21,02,349 रुपये मिळतील.एफडीवर व्याजपोस्ट ऑफिस एफडीमध्ये तुम्हाला केवळ 5 वर्षांच्या मुदत ठेवीचा पर्याय मिळत आहे. आता तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD देखील ऑफिस एफडीमध्ये तुम्हाला केवळ 5 वर्षांच्या मुदत ठेवीचा पर्याय मिळत आहे. आता तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD देखील मिळवू शकता. व्याजदर वर्षानुसार बदलत राहतात. सद्यस्थितीत 1 वर्षासाठी निश्चित केल्यास 6.9%, 2 वर्षांसाठी निश्चित केल्यावर तुम्हाला 7.0%, 3 वर्षांसाठी निश्चित केल्यावर तुम्हाला 7.0%, 5 वर्षांसाठी निश्चित केल्यावर तुम्हाला 7.5% व्याज मिळेल.
Available onGoogle PlayApp Storeहे लक्षात घ्या तुम्ही ज्या व्याजदराने FD सुरू करता, त्याच दराने तुम्हाला मॅच्युरिटीवर रक्कम मिळेल. समजा तुम्ही आज 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक केल्यास तर तुम्हाला 5 वर्षांनंतर केवळ 7.5 टक्के व्याज मिळू शकते. यादरम्यान व्याजदरात बदल झाला तरी त्याचा तुमच्या एफडीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु 5 वर्षांनंतर, ज्यावेळी तुम्ही तुमची FD रिन्यू कराल, त्यावेळी तुम्हाला त्यावेळच्या प्रचलित व्याजदरानुसार व्याज मिळेल. ते थोडे जास्त किंवा कमी असे, हे लक्षात ठेवा.




