
Police : नगर तालुका : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील २८ पोलीस निरीक्षकांच्या (Police Inspector) बदल्यांचे आदेश विशेष पोलीस (Police) महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी आज काढले आहेत. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे (c) निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह १० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Transfers) जिल्ह्याबाहेर करण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यात नऊ नवीन पोलीस निरीक्षक रुजू होणार आहेत.
अशा झाल्या बदल्या (Police)
नगर जिल्ह्यातील सुहास चव्हाण यांची बदली नंदुरबारला, घनश्याम बळप यांची बदली नाशिक ग्रामीण, मुधकर साळवे यांची बदली जळगाव, हर्षवर्धन गवळी यांची बदली धुळे, वासुदेव देसले यांची बदली नंदुरबार, चंद्रशेखर यादव यांची बदली धुळे, संजय सानप यांची बदली नाशिक ग्रामीण, विलास पुजारी यांची बदली नाशिक ग्रामीण, सोपान शिरसाठ यांची बदली नाशिक ग्रामीण तर शिवाजी डोईफोडे यांची बदली नाशिक ग्रामीण येथे करण्यात आली आहे.
यांचा समावेश (Police)
नगर जिल्ह्यात बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांत खगेंद्र टेंभेकर (नाशिक ग्रामीण), संदीप कोळी (नाशिक ग्रामीण), समीर बारावकर (नाशिक ग्रामीण), समाधान नागरे (नाशिक ग्रामीण), रामकृष्ण कुंभार (जळगाव), नितीन देशमुख (धुळे), आनंद कोकरे (धुळे), सतीश घोटेकर (धुळे) व सोपान काकड (नाशिक ग्रामीण) समावेश आहे.