PM Narendra Modi visit to Shirdi : मोदींच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विखे व पाचपुते यांची आढावा बैठक

    121

    श्रीगोंदा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शिर्डी (Shirdi Visit) येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, संदीप नागवडे, भगवान पाचपुते, आण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, दिनकर पंदरकर, अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, कृषी अधिकारी दीपक सुपेकर उपस्थित होते.

    या बैठकीत डॉ. सुजय विखे म्हणाले की, निळवंडे धरण कालव्यांचे लोकार्पण, विमानतळ इमारतीचे भूमीपूजन ,साई संस्थानच्या दर्शन काॅम्पेल्क्सचे उद्घाटन असे कार्यक्रम मोदीजींच्या उपस्थित संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्र  व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गावपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ श्रीगोंदा तालुक्यातील हजारो नागरिकांनी घेतला आहे. अशा सर्व लाभार्थ्यांनी पंतप्रधानांचा हा नियोजित दौरा व्यवस्थितपणे पार पडावा, या उद्देशाने कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

    प्रधानमंत्री आयुष्मान भारत, महिला बचत गट अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना  कार्यक्रमस्थळी आणण्यासाठीची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी, अशा देखील सूचना या बैठकीत खासदार सुजय विखे यांनी केल्या. या बैठकीला अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, मिलींद दरेकर, अजित जामदार, सुनील वाळके, ॲड.महेश दरेकर, सुवर्णा पाचपुते, दादाराम ठवाळ, श्रीगोंदा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here