PM Modi In Pune: ‘रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब’, पुणे दौऱ्यात मोदींच्या मेट्रो प्रवासावर काँग्रेसची टीका

377

PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कामांचं लोकार्पण झालं. यावेळी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं उदघाटन केलं आणि मेट्रोतून प्रवासाचाही अनुभव घेतला. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मोदींनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा प्रवास केला. मेट्रो प्रवासत मोदींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पण मोदींच्या याच कृतीवर आता काँग्रेसनं टीका केली आहे. 

मोदींनी मेट्रो प्रवासात शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला खरा पण आज रविवार असतानाही ही मुलं शाळेत का जात आहेत?, असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुनही मोदींच्या या कृतीबाबत सवाल उपस्थित कऱण्यात आला आहे. “रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात?”, असं सवाल करत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

मोदींनी मेट्रो प्रवासात शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांना विविध प्रश्न विचारले. यात मोदींनी या शालेय विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारलं याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची भेट घेऊन तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही कोणत्या शाळेत शिकता आणि आमची नावं विचारली”, असं मोदींशी संवाद साधलेल्या विद्यार्थिनीनं म्हटलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here