Pink Rickshaw : महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘पिंक रिक्षा योजना’

    136

    Pink Rickshaw नगर : महिलांना रोजगाराची (Women Empowermentसंधी उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. मात्र आता महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. पिंक रिक्षा (Pink rickshawअसं या योजनेचे नाव आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkareयांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

    पिंक रिक्षा ही योजना महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू करणार आहेत. यामध्ये  मुंबई, नवी मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर व ठाणे या ठिकाणांचा समावेश आहे. भारतात या पिंक रिक्षा महिलांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय  ठरणार आहेत. या रिक्षांमधून महिलांचा छळ आणि गैरवर्तन पूर्णपणे टाळता येईल.  महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटन सह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यासारखे विशेष फीचर या रिक्षात बसवण्यात आले आहेत.

    पिंक रिक्षा ही पूर्णपणे गुलाबी रंगाची आहे. त्याचे छत गुलाबी रंगाचे आहे. महिलांसोबत गैरवर्तन तसेच लैंगिक अत्याचार आणि बलात्कारांपासून संरक्षणासाठी भारत सरकारने रांचीमध्ये या रीक्षासंदर्भात पहिले पाऊल उचलले आहे. पहिल्यांदा रांचीमध्ये 2013 साली  पिंक रिक्षा ही  योजना  सुरू करण्यात आली. काही काळांतर भारतात अनेक शहरांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पिंक ऑटो रिक्षामध्ये महिलाच चालक आणि प्रवासी देखील महिलाच असतील, ज्यामुळे महिलांना रोजगारही  मिळेल आणि महिलांचा प्रवासही सुरक्षित होईल .

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here