Petrol,Diesel Price Hike : इंधनाच्या किमतीमध्ये आज पुन्हा वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

565

Petrol, Diesel Price Hike : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल दहा वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी इंधनाचे दर स्थिर होते. त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र शनिवारी आज पुन्हा एकदा इंधनाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे, नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.61 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 117.57 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 101.79 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे सात रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची तर डिझेलच्या दरात देखील 80 पैशांचीच वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 117.57 रुपये तर डिझेल 101.79 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 117.36 आणि डिझेल 100.06 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 116.77 तर डिझेल 99.51 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 116.38 आणि 99.12 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 116.40 रुपये लिटर आणि डिझेल 99.17 रुपये लिटर इतके आहे.

गेल्या बारा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये दहावेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च आणि 1 एप्रिल रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या बारा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल सात रुपयांपेक्षा अधिक महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here