Petrol and Diesel Price in India : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Rate) जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price);103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे.



