Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?

411

Petrol-Diesel Price Today 1 March 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil)  वाढले आहेत. असं असलं तरीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. राष्ट्रीय बाजारात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Price) स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरु आहेत. 10 मार्च रोजी पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 मार्चपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. 

देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here